चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ
नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती कमी जास्त होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर होत आहे. मात्र युद्धाचा परिणाम पाहता पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ३ आठवडे विक्रमी पातळीवर राहिलेल्या रशिया-युक्रेन तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आल्या आहेत. त्यामुळे आज पुन्हा दरवाढ झाली आहे.
आज पुन्हा एकदा या दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात.
या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर 112.51 रुपये आणि डिझेलचा दर 96.70 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 107.18 रुपये तर डिझेलचा दर 92.22 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 103.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटर आहे.
