महागाई च्या विरोधात शिवसेनेची अंत्ययात्रा

पुणे: पेट्रोल-डिझेलसोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सुरू असलेल्या वाढीमूळ सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरवाढ सुरु आहे. राज्यात पेट्रोल प्रति लिटर १११ रुपये तर डिझेल ९५ रुपये झाले आहे. याचबरबरोबर घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरची किंमत ९५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या विरोधात  आज सकाळी पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने  आंदोलन केले.आज दुपारी शिवसेनेने
शास्त्री रोड, नवी पेठ येथे घरगूती गँस सिलिंडरची प्रतिकात्मक प्रेत यात्रा आंदोलन केले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी नेतृत्व केले. या आंदोलनाला गजानन थरकुडे नगरसेवक विशाल धनवडे ुवा सेनेचे कार्यकर्ते व महानगरपालिकेतील नगरसेवक पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले,राज्यात पेट्रोल प्रति लिटर १११ रुपये तर डिझेल ९५ रुपये झाले आहे. याचबरबरोबर घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य माणूस हादरून गेला आहे. सामान्य माणसाला यातून सूट भेटली पाहिजे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात
आज आम्ही घरगूती गँस सिलिंडरची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून आज आम्ही केंद्र सरकारचा निषेध करत आहोत असे संजय मोरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: