रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्या यासंदर्भात आम्ही शरद पवारांना भेटणार -चित्रा वाघ

पुणे: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला .त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत . त्यावर आता एक महिला म्हणून मला खुप वाईट वाटते. एक व्यक्ती एक पद असा जर न्याय असेल तर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचाही राजीनामा घ्यायला पाहिजे .यासंदर्भात शरद पवारांना भेटणार, आणि त्यांना सांगणार आहे. असे भाजपच्या नेत्याचित्रा वाघ या पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या ,आमच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षांकडेही राष्टीय पातळीवर पद होते .म्हणून आम्ही राजीनामा घेतला नाही.एक महिला म्हणून खुप वेदनादायी आहे.त्यांच्या राजीनाम्यामागे नेमकं कोणत कारण आहे हे शोधलं पाहिजे. असे चित्रा वाघ म्हणाल्या

रघुनाथ कुचीक प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहे . रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितांना मदत करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. पीडितेला न्याय मिळवून देणे ही चूक आहे का? यावेळी चित्रा वाघ यांनी पीडितेला आलेले मेसेज वाचून दाखवले. त्या दिवशी पीडितेची ब्लड टेस्ट का केली नाही. त्या पीडितेची सत्यता तपासायला हवी होती पण अस काहीच झाल नसल्याचा आरोप व चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या,माझ्याकडे त्या पीडितेची लेखी तक्रार आली आहे. अशीच तक्रार पोलिसांनाही दिली आहे. मी तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पोलिसांनी फक्त एकाचीच चौकशी केली आहे. बाकीच्या लोकांची चौकशी का केली नाही. असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
मुलीबाबाबत महाराष्ट्रात इतकं भयभीत वातावरण आहे.म्हणून जितेंद्र आव्हाड म्हणाले, का माझ्या मुलीला महाराष्टात राहू देणार नाही. पीडित मुलीची नार्को टेस्ट करा आम्हाला काही फरक पडत नाही.टेस्ट करा असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.
राज्य सरकारने माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम चालवली. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या. माझं कुटुंब माझी जबाबदारी मग हे काय चाललंय? रघुनाथ कुचिक कडे राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे तो काढून घ्या .त्याच्याकडे असणारे सर्व पद काढून घ्या अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पीडित मुलीची नार्को टेस्ट होण्यासाठी कोर्टाची परवानगी लागते.त्या वर चित्र वाघ म्हणाल्या,आम्ही कोर्टात जाणार.

Leave a Reply

%d bloggers like this: