Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : शाळेच्या नराधम वॉचमनला पोलिसांकडून अटक

पुणे: शहरातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ पसरली आहे. शहरातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने १३ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. अखेर त्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

अत्याचार करणारा नराधम हा 32 वर्षीय शाळेचा वॉचमन असल्याचं समजतंय. हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याचंही समजत आहे. त्याचं नाव मंग्या असून जनवाडीतील दारू गुत्यावरून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पीडीत मुलगी जिथे राहत होती तिथेच हा आरोपी राहायला होता. पोलिसांकडून संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आलं होतं. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला ढकलत एका नामांकित शाळेतील बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकारानंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांच्या कानावर ही घटना घातली. मुलीच्या आईला व पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. त्यानंतर या आरोपीच रेखा चित्र तयार करण्यात आलं होतं. अखेरिस या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
घडलेली घटना अशी, पुण्यातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने ११ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading