Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 14 नवीन कोरोना रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे गेल्या २४ तासात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यची नोंद नाही.

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 793 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 336 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 108 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण गंभीर आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2104 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading