अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या अलंकार (एम.ए.)च्या परीक्षांचे रंगमंच प्रदर्शन 

पुणे : डाॅ.नंदकिशोर कपोते यांची नंदकिशोर कल्चरल सोसायटी ही नृत्य संस्था अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाशी १९८३ सालापासून (३९ वर्षे ) संलग्न आहे. महात्मा फुले वस्तु संग्रहालय, घोडे रोड,पुणे येथे नंदकिशोर कल्चरल अकादमीत दिनांक २१ व २२ रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या अलंकार च्या परीक्षा घेण्यात आल्या. तर रंगमंच प्रदर्शन रसिक प्रेक्षकांच्या भरघोस उपस्थितीत पार पडले. कोरोना, लाॅकडाउन या दोन वर्षांच्या काळा नंतर रसिकांसमोर रंगमंच प्रदर्शनात नृत्य सादर करताना नृत्य कलाकारांच्या चेहर्‍यावर आनंद,उत्साह दिसून येत होता. विविध नृत्य वर्गातील सोळा विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

पुण्यातील नृत्य शिक्षक नीलिमा हिरवे, अस्मिता ठाकूर, वेदांती भागवत, ऋजुता सोमण, शिल्पा भोमे, जाफर मुल्ला यांच्या विद्यार्थीनी ऋतुजा जोशी, मेधा नगरद, मेघा नगरद, हिमालय समुद्र, सुरभी कुलकर्णी, मधुरा पासलकर, तुलसी कुलकर्णी, सुमेधा गाडेकर या अलंकार प्रथम व भाग्यश्री कुलकर्णी, स्वप्ना जोग, ईशा कुलकर्णी या अलंकार पूर्ण परीक्षेस बसल्या होत्या. सर्व कलाकारां ची एकल प्रस्तुती होती. प्रत्येकाने कथक नृत्य परंपरेनुसार थाट,आमद,तोडे, तुकडे, परन, कवित्त,गत निकास, बांठ,लडी व अभिनय पक्षात गतभाव, ठुमरी, नायिका याचे सादरीकरण जोशपूर्ण रितीने केले. रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगमंच प्रदर्शन रंगले. या परीक्षां चे रंगमंच प्रदर्शन पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं. डाॅ. विकास कशाळकर उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे व डाॅ.कपोते यांच्या परीक्षा कार्या चे कौतुक केले. डाॅ.कशाळकर यांचा सत्कार प्रसिध्द कथक नर्तक व केंद्र व्यवस्थापक डॉ.नंदकिशोर कपोते यांनी केला. या अलंकार परीक्षा घेण्यासाठी परीक्षक म्हणून नाशिक च्या सुमुखी अथनी व कोकणातून(देवरुख)शीतल मुंगळे या दोन दिवस पुणे येथे उपस्थित होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: