fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

The Kashmir Files : .. तर प्रोड्युसरने कश्मीरी पंडितांच्या घरबांधणीसाठी पैसे द्यावेत – जयंत पाटील

मुंबई : कश्मीर खोऱ्यात 1990 मध्ये कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. एकीकडे भाजपने या चित्रपटाला उचलून धरले आहे तर दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्ष नेत्यांनी संसदेत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याचेच पडसाद आज विधीमंडळातही उमटले. “कश्मीर फाइल्स’ इंटरव्हलनंतर फारच बोरिंग सिनेमा आहे. 17 कोटींच्या या चित्रपटाने आतापर्यंत 160 कोटी पेक्षा जास्त कमावले आहेत. तुम्हाला ‘कश्मीर फाइल्सचं’ इतकंच कौतुक असले तर तितके पैसे या चित्रपटाच्या प्रोड्युसरने कश्मीरी पंडितांच्या घरबांधणीसाठी द्यायाला सांगा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना विधिमंडळात बोलण्यासाठी मिळणाऱ्या वेळेवरून सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षात शाब्दिक चकमक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर भाष्य केले. ते म्हणाले की, डंके की चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा बघायला गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो. तुम्हाला काही अडचण आहे का? असा प्रश्न त्यांनी सत्ता पक्षाला केला. यावर  जयंत पाटील यांनी भाष्य करत या चित्रपटाच्या प्रोड्युसरने कामावलेले पैसे कश्मीरी पंडितांच्या घरबांधणीसाठी पैसे द्यावेत, अशी मागणी करत फडणवीसांना टोला लगावला.

विरोधी पक्षालाही चर्चेसाठी 50 टक्के वेळ मिळावा 

विधिमंडळात बोलण्यासाठी मिळणाऱ्या वेळे विषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सदनात चर्चेसाठी 50 टक्के वेळ जर सत्ता पक्षाला मिळत असले, तर 50 टक्के वेळ विरोधी पक्षाला मिळायला हवा, अशी मागणी केली आहे. तसेच काँग्रेसला एक तास चर्चेसाठी वेळ निश्चित करून दिला असताना ही त्यांनी अधिक वेळ घेतल्याचं ते म्हणाले आहेत. यावरच बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  म्हणाले की, काँग्रेसने एक तासाहून कमी वेळ चर्चेसाठी घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading