एसटी पुन्हा सुरू करा या मागणीसाठी कृती समितीचे धरणे आंदोलन

पुणे : गेले चार महिने एसटी कर्मचारी यांचे विलगीकरण सरकारने केले नाही. यामुळे एसटी कर्मचारी हा संपावर आहे. एसटी विलगीकरणचा प्रश्न अजूनही कोर्टात प्रलंबीत आहे. जो पर्यत विलगीकरण आमचे होत नाही. तो पर्यत एसटी कर्मचारी संपवार राहण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. परत एसटी सुरू करा. कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे या साठी विविध कृती समित्यानी आज धरणे आंदोलन केले.

या धरणे आंदोलनाचे नेतृत्व सामाजीक कार्यकर्ते नितीन पवार यांनी केले. या धरणे आंदोलनाला कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नितीन पवार म्हणाले, गेले चार महिने आपल्या राज्याची जीवनवाहिनी -विकास वाहिनी -शिक्षण वहिनी असलेली एसटी अर्थात लाल परी बंद आहे. बंद कामगार आणि सरकार यांच्यामध्ये खडाखडी  चालू आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकारने अजूनही सोडवीले नाहीत. खेडे गावात अजूनही एसट्या बंद आहेत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल होत आहेत. प्रवास वाहतूक करण्यासाठी एसट्या सरकारने लवकरात लवकर चालू कराव्यात यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत, असे नितीन पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: