निवडणुका संपल्या! पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडर महागला
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता महागाईचे अच्छे दिन सुरू झाले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली आहे.
एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट आता बिघडणार आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 110 रुपये 82 पैसे प्रतिलीटर इतका असून डिझेल 94 रुपये 14 पैसे प्रति लीटर आहे. पश्चिम बंगालसह अन्य राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर दिवाळीपर्यंत पेट्रोलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या दिवसांत पेट्रोल 8 रुपये 15 पैसे प्रतिलिटर इतके महाग झाले होते.