Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि नवीन व जुने होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपींग विषयक देखभाल व दुरुस्तीचे काम केले  जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.24) रोजी वरील पंपींगच्या अखत्यारीत येणाऱ्या जवळपास पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.25) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी खालील भागातील पाणी पुरवठा राहणार बंद –

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र 42, 46 कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतु:श्रृंगी/SNDT/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरे गाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परिसर.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र : विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव,
मुळा रोड, खडकी, MES, HE Factory, हरी गंगा सोसायटी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading