पुण्याच्या विद्यार्थ्यांचे संगीत नाटक अकादमीच्या महोत्सवात सादरीकरण
पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या संगीत नाटक अकॅडमी तर्फे आयोजित प्रतिष्ठित ‘स्वर सुधा कोरल म्युझिक इंस्ट्रुमेंटल महोत्सवा’त सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. राजस्थानमधील जोधपूर येथे या महोत्सव झाला. देशभरातील कलाकारांनी या तीन दिवसीय महोत्सवात सादरीकरण केले. संपूर्ण सादरीकरणाचे संयोजन आणि मार्गदर्शन स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी केले होते.
संगीत नाटक अकादमीच्या वतीने हा महोत्सव अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु पहिल्यांदाच विद्यापीठांना या महोत्सवात सामील करून घेण्यात आले. देशभरातील केवळ चार विद्यापीठांना या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली यामध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचा समावेश आहे.
