महिला रेल्वे डब्यात पोलिस का नाहीत? – चित्रा वाघ यांचा थेट रेल्वे मंत्रालयाला सवाल   

पुणे : राज्यात महिलांच्या असुरक्षेविषयी अनेक घटना समोर येत आहेत. यावर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ या तर सातत्याने महिलांविषयक प्रश्न मांडत असतात. आज ही चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करीत ‘महिला रेल्वे डब्यात पोलिस का नाहीत? असा सवाल थेट रेल्वे मंत्रालयाला विचारात भाजपला घरचा आहेर दिलाय.

काल एका महिलेने रात्री उशिरा महिला रेल्वे डब्यात पोलिस नसल्याची तक्रार करीत एक व्हिडिओ ट्वीट केला होता. या प्रकरणा वरून चित्रा वाघ यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटंले आहे की, महिला व मुलींवरचे वाढते हल्ले पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय? महिला रेल्वे डब्यात पोलिस का नाहीयेत? याचे रेल्वे मंत्रालयाने उत्तर द्यावे. कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याच जणींना जीव गमवावे लागलेत, त्यामुळे याची चौकशी व्हावी, असे आवाहन चित्रा वाघ यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: