Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील वास्तूविशारद महेश नामपूरकर यांना सर्वोत्कृष्ट रचनेसाठीचा आंतरराष्ट्रीय ‘मूस डिजाईन पुरस्कार’ जाहीर

पुणे : पर्यावरणपूरक आणि शाश्वत इमारतीच्या रचनेसाठी पुण्यातील  वास्तूविशारद महेश नामपूरकर यांना ‘मुस डीजाईन अवॉर्ड'(Muse Design Award) हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक येथे उभारण्यात आलेल्या विवेदा वेलनेस सेंटर’च्या रचनेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मूस डीजाईन अवॉर्ड्स हा मूस पुरस्कार उपक्रमाचा  एक भाग आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील इंटरनॅशनल अवॉर्ड असोसिएट’तर्फे (आयआयए) २०१५ सालापासून हा उपक्रम  राबविला जातो. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर रचना शास्त्रात उत्कृष्टतेचे नवीन मानक प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दाखल घेत त्यांना सन्मानित केले जाते. तसेच अशा नावीन्यपूर्ण रचनांना प्रोत्साहन दिले जाते.

याबाबत वास्तुविशारद महेश नामपूरकर म्हणाले,” हा अतिशय मानाचा पुरस्कार असून, पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 3500 प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी आमच्या रचनेची ‘बेस्ट लँडस्केप’ म्हणून निवड करण्यात आली असून, त्यासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. भारतातही उत्कृष्ट रचनाकार आहेत, यावर या पुरस्काराने शिक्कामोर्तब केले असून, त्यामुळेच भारतासाठी, येथील वास्तू विशारद, रचनाकार यांच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्वाचा ठरतो. भारतातील सर्व रचनाकार, सुमनशिल्प’ची संपूर्ण टीम, माझी पत्नी आणि सहकारी उमा नामपूरकर यांच्यावतीने या पुरस्काराचा नम्रपणे  स्वीकार करताना, मला अतिशय आनंद होत आहे.”

विवेदा वेलनेस सेंटर विषयी – हरित अच्छादनाने व्यापलेली, जुन्या धाटणीच्या परंतु अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी रहिवासी वास्तू अशा विविध गोष्टींनी संपन्न असलेले विवेदा वेलनेस सेंटर नाशिक येथील त्रंबकेश्वर रस्ता येथे उभारण्यात आले आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या तत्वावर आधारित या वास्तूचे मुख्य उद्दिष्ट हे नागरिकांना निसर्गोपचाराचे महत्व पटवून देणे हे आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात असणारे रम्य वातावरण आणि उन्हाळ्यातील कोरडे आणि उष्ण वातावरण यांचा विचार करून या वातावरणाला पूरक असलेली वास्तू रचना याठिकाणी साकारण्यात आली असून, याठिकाणी नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात राहून आत्मशांती चा अनुभव घेण्यास मोठी मदत मिळते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading