समृद्धी महामार्गाचा विस्तार, नवीन बुलेट ट्रेनचा प्रस्ताव, भूविकास बँकांना 964 कोटींची कर्जमाफी
अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी महापालिका निवणुका डोळ्यासमोर ठेऊन यावेळी अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र रुग्णालय, मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा गडचिरोली पर्यंत विस्तार, भूविकास बँकांना 964 कोटींची कर्जमाफी, जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद, ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन, पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी, मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन आदी मोठ्या घोषणांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा –
- हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय
- मुंबई-पुणे समृद्धी महामार्गाचा गोंदिया गडचिरोलीपर्यंत विस्तार, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- भूविकास बँकेला 964 कोटींची कर्जमाफी
- गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार
- जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद
- मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
- तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
- आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद
- आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
- मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
- 15 हजार 773 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी तर इमारत बांधण्यासाठी 1 हजार कोटी
- एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार
- महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
- मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू 2023 च्या अखेरीस सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केली.
- वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, बेलापूर ही ठिकाणे जलमार्गाशी जोडणार; या ठिकाणच्या जेट्टींच्या विकासासाठी, खाडीची खोली वाढवण्यासाठीच्या कामासाठी 330 कोटींचा खर्च अपेक्षित आहे
- शिर्डी विमानतळाला 150 कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद
- मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार
- पर्यावरण पूरक 3 हजार बस सुरू करणार
- राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता राज्यात ई-वाहनांसाठी 5000 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
- परिवहन विभागाला 3 हजार 303 कोटींचा निधी
- पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित
