Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात 116 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होता आहे. आज दिवसभरात पुणे शहरात
116 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज सलग चौथ्या दिवशी पुणे शहरात एकही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

पुणे शहरात आजपर्यंत एकूण कोरोना रुग्ण संख्या 6 लाख 61 हजार 439 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 326 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 765 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 9 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2245 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading