fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

पुणेकरांची कल्पकता वाखाणण्याजोगी – चंद्रकांत पाटील

पुणे : ‘मेट्रो’चे स्वागत करण्यासाठी जोशी रेल्वे म्युझियमतर्फे मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन तयार करण्यात आली आहे. ही पुणेकरांची कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

जोशी रेल्वे म्युझियमचे रवी जोशी यांनी मेट्रो च्या स्वागतासाठी मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन तयार केले आहे. आज त्याचे छोटेखानी कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या वेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

येत्या काही वर्षात मेट्रोचे जाळे शहरभर उभे राहील आणि त्यातून शहरातील वाहतूक कोंडी सुटेल असेही ते म्हणाले. नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

जोशी रेल्वे म्युझियमचा समावेश पुणे दर्शन च्या स्थळा मध्ये असूनही येथे बस येत नाही, अशी खंत रवि जोशी यांनी व्यक्त केली. पुण्यातील हे आगळेवेगळे म्युझियम सर्वाना बघायला मिळावे, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading