नात्यामधील संवाद वाढवण्याची गरज- पल्लवी भागवत
पुणे : संसारामध्ये छोटया छोट्या गोष्टीवर राग व्यक्त करण्याची सवय लागते. रागामुळे मनावर ताण येतो. ताणामुळे नैराश्य येते. नैराश्य टाळण्यासाठी नात्यामधील सवांद वाढवण्याची गरज आहे.संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आला पाहिजे असे मत मानसपोचार तज्ञ पल्लवी भागवत यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिना निमित्त शिवकर्म प्रतिष्ठानच्या वतीने मानसिक ताण कसा हाताळवा या विषयावर मानसोपचार तज्ञ पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. तसेच, यावेळी विविध क्षैत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यावेळी भागवत बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवकर्म प्रतिष्ठानचे उद्धव गलांडे, वृषाली गलांडे यांनी केले होते. यावेळी दिशा संस्थेच्या पोर्णिमा गादिया, पत्रकार चैत्राली देशमुख, सामाजसेविका चांदणी गोरे, रोहणी सानप, डॉ पुजा गलांडे, मनिषा फाटे, भावना मोहोड,ज्योती कंकाळ, जनाताई जाधव, शैलेजा पाटील यांचा गौरव करण्यात आला.
या प्रंसगी मार्गदर्शन करताना भागवत म्हणाल्या की, घरातील कलहाचा परिणाम मुलांवर होतो. घरातील सतत भांडणामुळे मुलांवर मानसिक ताण येतो. माणसाने सकारात्म विचार केला पाहिजे. जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नये. जोडीदाराला एखादे लेबल लावू नये. जे जसे आहेत, तसे स्विकारले पाहिजे. जोडीदाराकडून अपेक्षा भंग झाल्यास ताण येतो. राग राग होते. यामुळे संपूर्ण संसारच बिघडतो. नात्यामध्ये विश्वास पाहिजे. आपण प्रत्येक घटनेकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास. आयुष्य सुखी होते. यावेळी चैत्राली देशमुख यांनी कौटुंबिक कायद्या विषयी माहिती दिली. यावेळी चांदणी गोरे, पौर्णिमा गादिया आणि रोहिणी सानप यांनी मत व्यक्त केली.
