मेघडंबरीच्या घुमटाचा दर्शनी काही भाग कोसळून पडला त्याची चौकशी करण्याची शिवसंग्राम पक्षाची मागणी

पुणे: कालच पंतप्रधानांच्या हस्ते, फार वाजत गाजत पुणे मनपाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. आज एक दिवसही पूर्ण होत नाही तोवर सदर पुतळ्याच्या मेघडंबरीच्या घुमटाचा दर्शनी काही भाग कोसळून पडला ! एकतर हे काम निकृष्ट दर्जाचे असणार किंवा ठेकेदाराने हे काम निष्काळजी पणे केलेले असणार. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.
शिवप्रेमींना शिवछत्रपींच्या पेक्षा कोणीही मोठे नाही. पंतप्रधान येणार म्हणून जर का घाईघाईत हे काम केले असेल तर ती जास्त गंभीर बाब आहे. ऐन अनावरण प्रसंगी जर छताचा हा भाग कोसळला असता तर पंतप्रधानही जखमी होण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला असता !
तरी आम्ही मागणी करतो की सदर दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून जबर दंड वसूल करावा. तसेच संबंधितांनी शिवप्रेमी व पुणेकरांची जाहीरहायक माफी मागावी. अशी मागणी आम्ही पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र बिनवडे यांना भेटून केली. अशी माहिती शिवसंग्राम संघाचे पुणे शहर अध्यक्ष तुषार काकडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: