आता राजकारण न करता युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर आणा – सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी
पुणे : युक्रेन मध्ये काही महाराष्ट्रातील मुले अडकली आहेत. त्यावर केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की प्लीज कृती करा. आपली मुलं अडकली आहेत त्यांना परत मायदेशी आणा. दुर्दैवाने आपलं एक मुलं गमावलं आहे, आता राजकारण न करता प्रसिद्धी न करता त्यांना लवकरात लवकर आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आम्ही या राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेने केली आहे. आमच्या पक्षाचे नेते अजित पवार, जयंत पाटील व बाकी नेते हे या यात्रेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे की एकत्र लढायचे याचा निर्णय लवकरच होईल, असे ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
