fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर EDची कारवाई

अहमदनगर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचे तिसरे नेते ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता EDच्या निशाण्यावर आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आज ED ने कारवाई केली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेच्या लिलावात राम गणेश गडकरी साखर कारखाना कमी किमतीत घेतल्या प्रकरणी ED ने ही कारवाई केली आहे. ED ने आज राम गणेश गडकरी साखर कारखान्याची जवळपास 13 कोटी 41 लाख किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का मिळाला आहे.

या कारवाईत ED ने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे.  ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading