दिलासादायक : आज पुणे शहरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्याही कमी होवू लागली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 44 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे आज पुणे शहरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. तर 131रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत एकूण कोरोना रुग्ण संख्या 66 लाख 4 हजार 41 इतकी झाली आहे. यापैकी 64 लाख 99 हजार 21 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत पुणे शहरात 9345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 63 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2649 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.