Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRA

वडापावचे पैसे देणार बार का! असे म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजपला चिमटा काढला

इंदापूर : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या दर्शनासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी शेजारीच असणाच्या वडापाव सेंटर येथे जात वडापाववर चांगलाच ताव मारला. एवढ्यावरचं न थांबता भरणेमामांनी वडापावचे बिल देत थेट भाजपाच्या नेतेमंडळींवरही निशाना साधला. यावेळी इंद्रेश्वर मंदीराचे ट्रस्टी आणि पत्रकार उपस्थित होते. यावेळी हॉटेल इंद्रेश्वरचे मालक शिवभक्त बाळासाहेब भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ठाणे स्टेशनबाहेर नुकत्याच भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी 200 वडापाववर ताव मारला पण बील न देताच ही मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर याबाबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सगळे निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व्हीडिओ तयार केला होता. त्यामुळं याबाबत सगळीकडं चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रकरण वाढू नये म्हणून तिथं जात बिल भरले होते. या प्रकरणाला हात घालत नंतर आमदार रोहित पवार यांनी निशाना साधला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वडापाव वर ताव मारत मी बिल देणार आहे बरं का! असं खमकावून सांगितले आणि आपल्या स्वीय्य सहायकाला बील द्यायला लावून भरणे मार्गस्थ झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading