Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

प्रारूप प्रभाग आराखड्याच्या 2 हजार 81 हरकतींवर झाली सुनावणी

पुणे: प्रभाग रचनेच्या प्राधिकृत आराखड्यावर निवडणूक आयोगाच्या वतीनं सुनावणी सुरु आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता यासुनावणीला सुरवात होत आहे. यशदाचे महासंचालक आणि राज्य निवडणूक आयोग  प्राधिकृत अधिकारी एस. चोक्‍कलिंगम यांच्यापुढे या हरकती-सूचना सादर केल्या जात आहेत.

काल दिवसभरात आलेल्या 1 हजार 515 हरकती-सूचनांपैकी 353 हरकती गुरुवारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर 2 हजार 081 हरकतींवर आज सुनावणी होईल. काल दिवसभरात दिवशी नव्या रचनेतील प्रभाग 1 ते 20, 27 ते 31 आणि 33 ते 35 या प्रभागातील तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, नागरिक, सोसायट्यांचा समावेश होता. गटश: या हरकती नियोजित केल्या आहेत. चोक्‍कलिंगम यांनी हरकती-सूचना ऐकून घेतल्या. दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे.

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणीसाठी महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार, अतिरिक्‍त आयुक्‍त रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, पुणे महापालिकेतील उपायुक्‍त आणि निवडणूक अधिकारी अजित देशमुख आदी प्रशासकीय अधिकारीही उपलब्ध होते. याबरोबरच ज्या प्रभागातील तक्रारदारांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading