Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

बाहेर कितीही आंदोलन करू देत बैठकांमध्ये पाठिंबा देतात मोहोळ यांची राष्ट्रवादीवर टीका

पुणे : फेसबुक लाइव्हमधून नदीसुधार प्रकल्पाची टिंगल करणाऱ्यांनी देखील आज शहराच्या विकासाच्या सर्व प्रकल्पांना एकमताने मान्यता दिली. बाहेर कितीही आंदोलन करू देत बैठकांमध्ये पाठिंबा देतात. अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, मुळामुठा संवर्धनासाठी मैलापाण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. याप्रकल्पाला काहीसा विलंब झाला आहे, पण आता हा प्रकल्प सुरू होत आहे. पुढील काही वर्षात नदीचे व शहराचे चित्र बदलणार आहे. याप्रकल्पाचे ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील महत्त्वाचे प्रकल्प रखडले होते. त्यांना आता गती मिळणार आहे. शिवणे व खराडी हे रस्ता देखील महत्त्वाचा आहे, पण राष्ट्रवादी व शिवसेनेच्या लोकांनी रस्ते अडविल्याने काम रखडले आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading