Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे  नवीन 193 रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोनाच्या  रुग्ण संख्या  कमी – जास्त होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या दोनशे च्या  आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी  होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 193 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 66 लाख 00 हजार 61 इतकी झाली आहे .यापैकी 6 4लाख93 हजार094रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1तर हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात9342जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 1हजार 415 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3284 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading