Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

PMPML – कात्रज ते विंझर बस वेल्हे-किल्ले तोरणा पर्यंत, कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) नवीन बस सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून आज दिनांक २४/०२/२०२२ पासून मार्ग क्रमांक २९६ कात्रज ते विंझर या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणा पर्यंत करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २०९ ब कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. पुण्यनगरीचे महापौर  मुरलीधर मोहोळ व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्या हस्ते कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका  राणी  भोसले, नगरसेविका वर्षा तापकीर, नगरसेवक  राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक  दत्ताभाऊ धनकवडे, नगरसेवक  प्रकाशशेठ कदम, नगरसेविका अमृता  बाबर, नगरसेविका  स्मिता कोंढरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, जि. प. सदस्य अमोल नलावडे भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष  गंगाराम जगदाळे, उपाध्यक्ष हनुमंत साळुंके, गराडे गावचे सरपंच नवनाथ गायकवाड, उपसरपंच समीर तरवडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश जगदाळे, थापेवाडीचे सरपंच निलेश जगदाळे, कात्रज आगार व्यवस्थापक  विजय रांजणे, सहाय्यक आगार व्यवस्थापक शैलेंद्र जगताप, आगार अभियंता  सचिन वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक २९६ – कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते वेल्हे पहिली बस सकाळी ५.५० वा. तर शेवटची बस रात्री ८.४५ वा. आहे.  वेल्हे ते कात्रज पहिली बस सकाळी ६.०० वा. तर शेवटची बस रात्री ९.०० वा. आहे.

मार्ग क्रमांक २०९ ब – कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते सासवड पहिली बस सकाळी ६.०५ वा. तर शेवटची बस रात्री ८.२० वा. आहे. तसेच सासवड ते कात्रज पहिली बस सकाळी ७.२५ वा. तर शेवटची बस रात्री ९.३५ वा. आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading