Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे दुसऱ्या दिवशीही निषेध आंदोलन

पुणे : काल ईडी ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली असून आता ते ईडी च्या कोठडीत आहेत. ईडीने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आज सलग दुसऱ्या शिवशीही राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात अलका चौक येथे करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,किशोर हनुमंत कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेसपुणे शहर,मनोज पाचपुते-अजिंक्य पालकर कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रशांत जगताप म्हणाले, सरकारच्या दबावापुढे झुकून आणि राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून मलिक यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणेचा दुरुपयोग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि असले प्रकार खपवून घेणार नाही. आम्ही मुंबईत पण आज मोठे आंदोलन केले आहे. नवाब मलिक यांनी कोणताही घोटाळा केला नाही. तरी भाजप सरकार महा विकास आघाडी सरकार पाडण्यासाठी असले घाणेरडे प्रकार करत आहे. त्या भाजपने आमच्या शरद पवार साहेबांना पण सोडले नाही. जो पर्यंत नवाब मलिक साहेब यांची सुटका व त्यांना योग्य न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच चालूच ठेवणार, असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading