पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 215 नवीन रुग्णांची नोंद
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 215 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 446 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत कोरोना रुग्ण संख्या 65 लाख 98 हजार 68 इतकी झाली आहे. यापैकी 64 लाख 89 हजार 86 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9342 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 540 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 95 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3490 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
