Friday, June 5, 2026
BusinessLatest News

देशातील अग्रगण्य पादत्राणे ब्रँड वॉकरूतर्फे पुण्यात आउटलेट सुरु करण्याची घोषणा

पुणे : देशातील सर्वात मोठी पीयू फुटवेअर कंपनी असलेल्या वॉकरू इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यात चाकण, हडपसर आणि भोसरी येथे ३ स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. या तीनही आउटलेट्समध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी आकर्षक किमतीत फॅशनेबल चप्पल-बुटचे अनेक पर्याय आहेत. या विशेष रिटेल आउटलेट्समध्ये ग्राहकांच्या गरजा समजून घेत उत्पादनांमध्ये तसे बदल करण्यात येतील. ग्राहकांशी थेट कनेक्ट होण्याच्या व्यवसाय धोरणाशी सुसंगत व्यवस्था या स्टोअरमध्ये असणार आहे

कॅज्युअल चप्पल, सँडल, फ्लिप फ्लॉप, कॅज्युअल शूज, स्पोर्ट्स शूज, फॉर्मल शूज आणि महिलांनी हाताने बनवलेल्या चप्पलांसह विविध प्रकारच्या पादत्राणांसाठी वॉकरूचे नवीन स्टोर एक-स्टॉप शॉप आहेत. त्यासह ब्रँडेड फुटवेअर व्यतिरिक्त स्टोअरमध्ये ब्लूटीगा फुटवेअर, बॉटोवी लेदर फूटवेअर आणि वॉकरू केअर प्लॅस कम्फर्ट सोलसह हलके पादत्राणे आणि स्ट्रॅबो बॅकपॅक देखील या स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.

या नवीन स्टोअरबाबत कंपनीचे संचालक राजेश कुरियन म्हणाले की आम्हाला आमचे नवीनतम कलेक्शन सादर करताना आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना देशातील आयटी आणि ऑटोमोबाईल हबमधून खरेदीचा अनुभव प्रदान करण्यात येत आहे. आमच्या स्टोअरमध्ये ५०० पेक्षा जास्त डिझाईन्स उपलब्ध आहेत. फुटवेअरमध्ये जलद फॅशन आणण्याच्या आमचा प्रयत्न यातूनच स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading