Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील हरकती सूचनांच्या सुनावणीला सुरुवात

पुणे:आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग आराखडा वरील सुनावणीला सुरुवात झाली असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ही सुनावणी होत आहे.

या हरकती सूचनांसाठी निवडणूक आयोगाकडून यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एक फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग आराखडा तयार झाल्यानंतर राष्ट्रवादी वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी नियमबाह्य प्रभागरचना झाल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार होत्या त्यानुसार आज व उद्या या प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading