सुप्रिया सुळे दिशा सालियन प्रकरणावरून संतापल्या म्हणाल्या, एवढं महाराष्ट्राचं आणि देशाचं असंवेदनशील राजकारण कुठे पाहिलं नव्हतं
पुणे : दिशा सालियानचा मृत्यू झाला आहे त्यावर वेगवेगळे रोज खुलासे होत आहेत .भाजपचे नेत्या नी हा खून केला आहे असा काही लोकांनी आरोप केला आहे. त्यावर,सुप्रिया सुळे दिशा सालियन प्रकरणावरून संतापल्या . म्हणाल्या एवढं महाराष्ट्राचं आणि देशाचं असंवेदनशील राजकारण कुठे पाहिलं नव्हतं असे राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,मी एक मुलगी आहे आणि मला एक मुलगी आहे. जर तिच्या घरचे सांगत असतील राजकारण करू नका .तरी हे बोलतात.नीच राजकारण चाललंय हे भाजपचे नाव घेतात मात्र त्यांचा विचार 10 टक्के जरी घेतला असता तरी चांगलं झालं असतं. अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आज परत ईडी ने कारवाई केली आहे. त्यावर नवाब मलिक हे कँबिनेट मंत्री आहेत, त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही.ईडीचं पथक त्यांच्या घरी जाऊन धडकलं मी त्यांच्या कुटुंबाकडून माहिती घेतली.मात्र नोटीस न देता ते घरी आले.. त्यांनी ईडीला पुर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या,एवढं महाराष्ट्राचं आणि देशाचं असंवेदनशील राजकारण कुठे पाहिलं नव्हतं. सुप्रिया सुळे या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,नवाब मलिकांवरमुंबईतील एनसीबी प्रकरणामुळे कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही .कारण सातत्याने ते खरे बोलतात त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सध्या राज्यात महा विकास आघडी मधल्या मंत्र्यांवर ईडीच्या कारवाई सुरू आहेत . त्यावर महा विकास आघाडी सरकार मधले मंत्री भाजप हे सगळ्या कारवाई करायला लावत आहे असा आरोप महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री करत आहे. त्यावर भाजपनं त्यांचा माणूस ईडी कार्यालयात ठेवलाय का ? कारवाया ठरवून केल्या जातं असतील अशी शक्यता नाकारता येत नाही .
भाजपचे अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष कॉमन आहेत का ? असा सवाल त्यांनी भाजपला विचारला.
शरद पवार यांना आमदार होऊन 55 वर्षे झाली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,कालचं पवारांना आमदार होऊन 55 वर्ष पुर्ण झाली आणि 55 वर्ष महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या व्यक्तीच्या भोवती फिरत राहिलं. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
