दिशा सालियान यांच्या आईवडिलांनी घेतली रुपाली चाकणकर यांची भेट
मुंबई : दिशा सालियान यांच्या आईवडिलांनी आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली.
यादरम्यान त्यांनी आपल्या मुलीची तिच्या मृत्यू पश्चात होणारी बदनामी ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांना समाजात सन्मानाने जगता येत नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले व तिच्या मृत्यूबद्दल प्रसार माध्यमातून खोटी माहिती जाहीर करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे व इतर सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे.
याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे व याबाबत सालियान कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे.
