‘अवघा रंग एक झाला’ गालिचा रांगोळी प्रदर्शन शनिवारपासून
राष्ट्रीय कला अकादमी आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने आयोजन
पुणे : राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा अमर लांडे यांनी दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी चित्रकार विशाल वाडे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय कला अकादमीचे २४ व्या वर्षात पदार्पण झाले आहे, त्यानिमित्त संस्थेच्या कला साधकांच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा ४ थे वर्ष आहे.
मराठी भाषा दिन, विज्ञान दिन, संगीत, शहीद जवानांसाठी श्रद्धांजलीपर रांगोळी अशा विविध विषयांवर गालीचा रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे.
