आज पुणे शहरात कोरोनाचे नवीन 188 रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. आज शहरात नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या च्या आत आढळून आली आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 188 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 65 लाख 96हजार 53 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 48 हजार 540 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 773 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 106 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3596 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
