आज पुणे शहरात 132 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
पुणे : कोरोनाची तिसरी लाट ओसली असून पुणे शहरातही कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. आज पुणे शहरात दिवसभरात कोरोनाचे 132 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 226 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्ण संख्या ही 6 लाख 59 हजार 266 इतही झाली आहेत. यापैकी 6 लाख 47 हजार 847 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1 तर पुणे शहर हद्दी बाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 82 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 119 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2593 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
