संजय राऊत रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे -चंद्रकांत पाटील
पुणे: एखाद्या माणसाला आपल्या पायाखालील वाळू घसरली की आपण आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे .आणि कारवाई होईल. आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबातील लोकांवर होईल. अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. अशी स्थिती आत्ता संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बातचीत करताना संजय राऊत यांच्यावर केली .
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या 27 महिन्यात एकही शिवसेनेच्या नेत्याने बोललं नाही. फक्त राऊत दिवसरात्र बोलत आहे. आणि त्यांनी जे आज शब्द उच्चारल आहे. ते नेहेमीच खालच्या पातळी वर टीका करत आहे.
देशाच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाले आहे की या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज मुंबईत येत आहे ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देणार आहे त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता. ते म्हणाले की 2019 ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. आणि जेव्हा मतमोजणी होती तेव्हा सर्वांनी नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. मग काय झालं ते देशाने पाहिलं. 2024 ला मोदीजी 400 च्या खाली येणार नाही.त्यांना फक्त जागा वाढवायच नाही तर काही उद्दिष्ट आहे. 2014 ते 2019 ला मोदीजी यांनी नेहेमीच नागरिकांच्या बेसिक गरजा लक्षात घेतल्या. आणि त्यानंतर त्यांनी पेंडिंग प्रश्नांकडे लक्ष दिलं आणि 2024 नंतर तर त्यांचं अजेंडा खूप मोठा आहे. संपूर्ण जगात भारत एक विश्वागुरु म्हणून समोर येईल. अश्या भेटीगाठी घेऊन काहीही होणार नाही तर तेलंगणात भाजप कशी वाढत आहे. याची काळजी घ्या. अस यावेळी पाटिल म्हणाले.
