Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का ? अजित पवार भर सभेत तरुणावर भडकले


पुणे:आज नेहमीप्रमाणे शिवनेरी गडावर शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणे सभेत भाषण करायला उभे राहिले. त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार चिडले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असे त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले.
आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला.

आज शिवजयंती आहे. असे चालणार नाही. असे त्यांनी म्हटले. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading