Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना

पुणे : जय शिवाजी, जय भवानीचा शिवभक्तांनी केलेला मर्दानी जयघोष… पारंपरिक युध्दकलेचा थरार… रणशिंगाची ललकारी… ढोलताशा पथकाचा गगनभेदी गजर… पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला, लहानमुले… अशा पवित्र वातावरणात शिवकालीन ऐतिहासिक स्वराज्यघराण्यांच्या उपस्थितीत जणू शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यातील लालमहालामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल येथे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे. सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांना औक्षण करुन झाली. समितीच्या हर्षाली कोलते, मयुरा हौन्स्वाडकर, शितल उपासनी, बिना भापकर, कुसुम मांढरे, जोत्स्ना गायकवाड, मंजुषा मांढरे, सारिका चव्हाण, शिखा गुप्ता, स्नेहा क्षीरसागर, पूनम रबडे यांनी शिवजन्म पाळणा सादर केला तसेच पोवाडा सादर केला.

पुण्याचे कोरोना योध्दा सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, सोहळ्याचे आद्य प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, आमदार दिलीप मोहिते, जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रताप परदेशी, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, संजय जगताप तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालून जिजाऊ मॉं साहेब-शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. विश्व शिवकालीन मर्दानी युध्दकला महासंघाचे सदस्य असलेल्या प्रा. राजेश पवार यांच्या शिवसंस्कार युध्दकला संघाने चित्तथरारक शस्त्र कला सादर केली. तसेच खास महाबळेश्वर वरुन आलेल्या रणशिंग पथकाने रणशिंगाची मानवंदना दिली. ढोलताशा पथकाने देखील वादन केले.

लालमहाल पासून शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापर्यंत फुलांच्या पायघड्या घालत शिवज्योत नेण्यात आली. पुणेकरांनी दुतर्फा गर्दी करीत शिवज्योतीचे स्वागत केले. सोहळ्याचे यंदा 11  वे वर्ष आहे.

सोहळ्याचे आयोजन समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पायगुडे, रवींद्र कंक, संजुभाऊ पासलकर, दीपक घुले, नीलेश जेधे, शंकर कडू, समीर जाधवराव, किरण देसाई, सागर पवार, गोपी पवार, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
ईशान अमित गायकवाड यांनी शिवाजी नगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी अनिशा जोगदंड, शाहू शिंदे, मयुरा युवराज शिंदे, स्वप्निल शिंदे, रिंकल अमित गायकवाड, कनिष्क सागर पवार यांनीही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन शिवरायांना मानवंदना दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading