Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस भवन येथे शिवजयंती साजरी

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्‍या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी अत्याचार नष्ट करून स्वराज्याची स्थापना केली. शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नव्‍हते, त्यांनी बारा बलुतेदार एकत्र करून स्वराज्य उभे केले. शिवरायांनी मराठी माणसाचा कना ताठ करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक तरूण पिढीने घेतला पाहिजे.’’

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक, नीता रजपूत, पूजा आनंद, उस्मान तांबोळी, सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन, दिपक ओव्‍हाळ, रजिया बल्लारी, प्रविण करपे, विनय ढेरे, बबलू कोळी हेरॉल्ड मॅसी, रवि पाटोळे, स्वाती शिंदे, बबलू सैय्यद, आसिफ शेख, अकबर शेख, सईद भाई, विजय वारभुवन, हनुमंत पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading