प्रभागरचनेवर ‘या’ दिवशी बालगंधर्व येथे होणार सुनावणी
पुणे : पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर साडे तीन हजारपेक्षा जास्त हरकती-सूचना आल्याने एकाच दिवशी त्यावर सुनावणी घेणे शक्य नाही. त्यामुळे २४ व २५ फेब्रुवारी रोजी गटागटाने बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी होणार आहे.
त्यासाठीचे वेळापत्रक महापालिकेच्या निवडणूक शाखेने जाहीर केले आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ५८ प्रभाग आहेत. त्यांचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून ३ हजार ५९६ हरकती सूचना आलेल्या आहेत. या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती व हरकतदारांच्या नावानुसार सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www. Pcmc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे, अशी माहिती निवडणूक शाखेचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
तारीख प्रभाग क्रमांक सुनावणीची वेळ
२४ फेब्रुवारी २०२२ – १ ते ९ – सकाळी १० ते ११.३०
- १० ते १६ – सकाळी ११.३० ते दुपारी १
- १७, १८,१९, २०,३०,३१,३३,३५ – दुपारी २.३० ते ४
- २७, २८, २९ – सायंकाळी ४ ते ६
२५ फेब्रुवारी २०२२ -२१,२२,२३,२५,२६,४१,४२,४३,४४,४५,४६ -सकाळी १०ते ११.३० - ३७,३८,३९,४० -सकाळी ११.३० ते दुपारी १
- ४७,४८,४९,५०,५७ – दुपारी २.३० ते ४
- ५१,५३,५४,५५,५६ – दुपारी ३.३० ते४.३०
- सर्वसाधारण हरकती-सूचना – सायंकाळी ४.३०ते ६
