Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

PMPML – स्वारगेट मुख्यालयात शिवजयंती साजरी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. परिवहन महामंडळाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे व प्रशासन अधिकारी  नितीन घोगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सुरक्षा अधिकारी  सुरेश सोनवणे, कामगार व जनसंपर्क अधिकारी  सतिश गाटे यांच्यासह आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, आगार अभियंता, कार्यालय अधीक्षक तसेच प्रशासन, वाहतूक व मध्यवर्ती यंत्रशाळा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना दत्तात्रय झेंडे म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायरूपी अंधकाराच्या काळोखात बुडालेल्या जनतेला प्रकाशात आणलं. परकीयांची गुलामी संपवली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, त्यांचे प्रेरणा देणारे विचार चिरकाल मार्गदर्शक ठरतील. छत्रपती शिवाजी महाराजांमधला एक जरी गुण आपण अंगीकृत केला तर तोच खरा त्यांना मानाचा मुजरा ठरेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading