Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शिवजयंती निमित्त पीएमपी कात्रज आगार व श्रीमंत सेवा प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : पीएमपीएमएलच्या कात्रज आगारामध्ये श्रीमंत सेवा प्रतिष्ठान व आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या शूर सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या रक्तदान शिबिरात १८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला जेवणाचा डबा (टिफिन) व पेन भेट म्हणून देण्यात आले. तसेच आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज यांच्या तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या रक्तदान शिबिरास आमदार  संजय जगताप, आमदार भिमराव तापकीर, नगरसेवक  दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेवक महेश वाबळे, नगरसेवक  बाळासाहेब धनकवडे, नगरसेवक राजाभाऊ कदम, नगरसेवक तुषार कदम, नगरसेविका  राणीताई भोसले, नगरसेविका अश्विनीताई भागवत, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  माधवराव जगताप, माजी नगरसेवक  विजयराव मोहिते, माजी नगरसेवक  शैलेंद्र नलावडे, मुंबई येथील उद्योजक  नितीन दळवी व उद्योजक  महेश पोटे ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे राम बांगड, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, प्रशासन अधिकारी नितीन घोगरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे, सामाजिक कार्यकर्ते दिपक उर्फ बाबा मिसाळ आदी मान्यवरांनी भेट दिली व या उपक्रमाचे कौतुक केले. 

श्रीमंत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पीएमपीएमएलच्या कात्रज आगारातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून तर दिलेच, त्याचबरोबर या माध्यमातून सर्व रक्तदात्यांनी एक प्रकारे देशसेवाच केली आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, सहाय्यक आगार व्यवस्थापक शैलेंद्र जगताप, आगार अभियंता सचिन वाबळे यांनी रक्तदान शिबिरास भेट देणाऱ्या मान्यवरांचे स्वागत केले.
या रक्तदान शिबीरासाठी आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम, श्रीमंत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत गिरे, सदस्य यशवंत जाधव,  विशाल फडतरे,  धन्यकुमार माने यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच कात्रज आगारातील सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.  सुभाष मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. निलेश जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading