महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही – आदित्य ठाकरे
पुणे: महानगरपालिका निवडणुकीत आघाडी होणार की नाही का युती होणार नाही याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यावर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसेल. महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की आघाडी करायची याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही .
असे शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे म्हणाले.
येरवडा येथील डॉ.चिमा उद्यान मध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं . यावेळी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपमधील काही नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांवर टीका करत असतात त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले किरीट सोमय्या, नारायण राणे यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवायचं. असे बोलून आदित्य ठाकरे यांनी किरीट सोमय्या व नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले.
