Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

होंडा H’ness CB350 आणि CB350R आता सीएसडी दालनांतही उपलब्ध

नवी दिल्ली :  सीएसडी लाभार्थ्यांची मोबिलीटी भागीदार म्हणून जपलेली दीर्घकाळ बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज देशभरातील कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंट्समध्ये (सीएसडी) H’ness CB350 आणि CB350R उपलब्ध  करत असल्याचे जाहीर केले.

होंडा बिगविंग उत्पादन श्रेणीतील या मध्यम वजनाच्या मोटरसायकल्स पहिल्यांदाच 35 सीएसडी डेपोट्समध्ये उपलब्ध केल्या जात आहेत.

या खास प्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘होंडा टुव्हीलर्स इंडियाने दीर्घकाळापासून भारतीय संरक्षण समाजाशी नाते जपलेले आहे. दर्जेदार उत्पादने आणि विक्रीपश्चात सेवांसह त्यांना सेवा पुरवताना आम्हाला अभिमान वाटतो. स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असतानाच आमच्या नव्या बिगविंग मोटरसायकल्स – H’ness CB350 & CB350R भारतभरातील सीएसडी नेटवर्कमध्ये उपलब्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. सीएसडी मान्यताप्राप्त खास किंमतीच्या उपलब्धतेमुळे संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना तसेच सीएसडी लाभार्थींना त्यांची आवडती होंडा 350सीसी मोटरसायकल खरेदी करणे आणि नवा प्रवास सुरू करणे सोपे होणार आहे.’

सीएसडी लाभार्थींसाठी खरेदी प्रक्रिया

सोप्या आणि सुरळीत खरेदी अनुभवाच्या मदतीने कर्मचाऱ्यांना https://afd.csdindia.gov.in/ वर लॉग इन करून सीएसडी पोर्टल नोंदणी, वितरकाची निवड करून त्यांच्या आवडीचे मॉडेल खरेदी करता येईल. निवडलेल्या वितरकाकडे गाडी उपलब्ध असल्याचे निश्चित झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वितरकाकडे कागदपत्रे (उपलब्धता प्रमाणपत्र आणि इनव्हॉइस) आणि ग्राहक कागदपत्रे (कँटीन कार्ड, केवायसी, पेमेंट हस्तांतराचे तपशील) अपलोड करता येतील व त्यानंतर लोकल सप्लाय ऑर्डरची डिजिटल प्रत (एलएसओ) वितरित केली जाईल.

होंडा बिगविंगविषयी – होंडाचा एक्सक्लुसिव्ह प्रीमियम मोटरसायकल व्यवसाय विभाग

प्रीमियम बाइक्सच्या चाहत्यांच्या आणखी जवळ जाण्यासाठी होंडाच्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटचे भारतात 80 बिगविंग टचपॉइंट्सद्वारे नेतृत्व केले जात आहे. बिगविंग टॉपलाइनमध्ये होंडाची संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणी (300-1800सीसी) उपलब्ध करण्यात आली असून होंडा बिगविंग मध्यम आकाराच्या मोटरसायकल चाहत्यांनासाठीही (300-500 सीसी) उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांना सहज आणि पारदर्शक बुकिंग अनुभव घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळावर www.HondaBigWing.in ऑनलाइन बुकिंग करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading