अरविंद स्मार्टस्पेसेसने पुण्यात जमिनीसाठी केली १०० कोटींची गुंतवणूक
पुणे : भारतातील आघाडीची रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या अरविंद स्मार्टस्पेसेस लिमिटेड (एएसएल)ने पुण्यात ३५ एकर जमिनीच्या खरेदीसाठी अंतिम करार करताना १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही जमीन पुण्यातील छोटी बाजारपेठ असणाऱ्या भूगावमध्ये आहे. या नवीन प्रकल्पामध्ये १.३ दशलक्ष चौरस फूट इतकी विकास क्षमता असलेल्या आलिशान निवासी व्हिला असणार आहेत. जेव्हा हे तयार होईल तेव्हा हा प्रकल्प अरविंद स्मार्ट स्पेसेसचा पहिला मोठा क्षैतिज निवासी विकास प्रकल्प म्हणून ओळखला जाईल आणि हा शहरातला दुसरा निवासी प्रकल्प असेल.
भूगाव हा मुळशी रस्त्याला लागून असलेला महत्वाचा निवासी भाग असून पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या आणि विकसीत होत असलेल्या भागांपैकी एक आहे. पुण्यातील लोकप्रिय आयटी हब असलेल्या हिंजवडीपासून हा प्रकल्प जवळच आहे. वेगाने विकसीत होत असलेली ही नवीन बाजारपेठ पुण्यातील कोथरूड, चांदणी चौक, औंध, पाषाण, बाणेर इत्यादी ठिकाणांच्या जवळ आहे. कंपनी या प्रकल्पाला इक्विटीमधील भाग, अंतर्गत जमा आणि नवीन कर्जातून निधी पुरवेल.
अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कमल सिंगाल म्हणाले, “पुण्यातील निवासी प्रकल्पांचा पोर्टफोलिओ बळकट करताना भूगाव मधील नवीन प्रकल्पाची घोषणा करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. कोथरूड मध्ये आमच्या पहिल्या प्रकल्पाच्या यशस्वितेनंतर या प्रकल्पामुळे पुण्याच्या आणखी एका नवीन बाजारपेठेत आमचा प्रवेश होत आहे. अलिशान आणि व्हिला पद्धतीच्या निवासी प्रकल्पांची मागणी वाढताना आम्ही बघत आहोत आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये या प्रकल्पाची भर घालताना आम्हांला खूपच आनंद होत आहे. हे ठिकाण शहरापासून जवळ असले तरी दाटीवाटीपासून लांब आहे. हिरवाईत, निसर्गाच्या जवळ जाणारे आणि क्षैतिज विकासासाठी आदर्श आहे. बंगळूरू आणि अहमदाबाद येथे स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविल्यानंतर पुणे आणि एमएमआर सारख्या नवीन विकास होत असलेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचे आमचे धोरण हे या जमीन अधिग्रहणाशी सुसंगत आहे.”
अरविंद स्मार्ट स्पेसेसने अलिकडेच दोन नवीन मोठ्या स्तरावरील प्रकल्पांची भर घातली. पहिला प्रकल्प बंगळूरू मधील देवनहल्ली येथे असून एचडीएफसी प्लॅटफॉर्म खाली त्याची अंमलबजावणी होईल आणि दुसरा निवासी व्हिला प्रकल्प बंगळूरू मधील सर्जापूर येथे आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूरू आणि पुण्यात कंपनीचा साधारण २५ दशलक्ष चौरस फुटांचा बांधकाम विकास आहे.
