मोदी माफी मागणार नाहीत – खासदार गिरीश बापट
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांच्या या खोट्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरीष बापट यांचे निवासस्थाना जवळ आंदोलन करण्यात आले.काँग्रेस कडून मोदी नी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांनी प्रसार माध्यमाशी संवाद केला.ते म्हणाले, मोदींनी काही चुकीचे केले नाही.मोदी माफी मागणार नाहीत.असे खासदार गिरीष बापट म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारीही सगळे पक्ष करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने एक दावा केला आहे. 15 मार्च नंतर महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी प्रवेश करतील त्यावर खासदार गिरीश बापट म्हणाले, तुम्ही आम्हाला 16 तारखेनंतर भेटा.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता परत येईन असा विश्वास गिरीश बापट यांनी व्यक्त केला. नगरसेवक जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावर बापट म्हणाले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गुंडांचा पक्ष आहे.
