Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने राष्ट्रवादीपुढे किमान 45 जागांचा प्रस्ताव ठेवला?

पुणे:पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर करण्यात आले असले. तरी पुण्यात मात्र काँग्रेसने आघाडीसाठी हात पुढे केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. किमान 45 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, राष्ट्रवादीतून याला दुजोरा देण्यात आला आहे.

त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशपातळीवर याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तरीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आघाडीचा निर्णय मुंबईतून होणार असल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीकडून वेट अँड वॉचची भूमिका दोन्ही पक्ष घेत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading