Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘संत शिरोमणी गुरु रविदास महाराज पुरस्कार’ यंदा शासनाच्या वतीने दिला जाणार – धनंजय मुंडे

पुणे : संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 645 जयंतीनिमित्त कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हा पुरस्कार गेले कित्येक वर्षे हा शासनाने दिलेला नाही. त्यावर आज ‘संत शिरोमणी गुरु रविदास महाराज पुरस्कार’ यंदा शासनाच्या वतीने दिला जाणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात केली.

आज धनंजय मुंडे यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 645 जयंतीला हजेरी लावली तेव्हा त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हा पुरस्कार गेली कित्येक वर्षे देण्यात येत नव्हता. त्यावर राज्य सरकारने हा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज गोपीनाथ मुंडे ऊस कामगारांसोबत बैठक पार पडत आहे. गोपीनाथ मुंडे ऊस कामगारांचे प्रश्न पुढे कित्येक दिवस प्रलंबित होते. ते सोडवण्यासाठी आम्ही या बैठकीतून नक्की प्रयत्न करणार आहोत, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading