Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

पुणे:पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर दीपकभाऊ मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक . बंडूभाऊ केमसे, नगरसेवक सुभाष जगताप, रुपालीताई ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्रीताई राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading