पुणे शहरात गेल्या 24 तासात 361 नवीन कोरोना रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळून येत आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 361 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 1165 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 57 हजार 878 इतकी झाली आहे .यापैकी 6 लाख 45 हजार 097रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0 तर हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 3हजार 488 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 163 रुग्ण गंभीर आहेत.आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4780स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
